मनोरंजन

अमिताभ बच्चन बनले सनी लिओनीचे शेजारी

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईत नवे घर खरेदी केल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईमध्ये नवे घर खरेदी केले आहे. बिग बींने खरेदी केलेले घर हे सनी लिओनीच्या घराच्या शेजारी असल्याचे म्हटले जात आहे. या घराची किंमत तब्बल ३१ कोटी रुपये असून बिग बी सनी लिओनीचे शेजारी बनले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमिताभ यांनी या घरासाठी ६२ लाख रुपये स्टॅम ड्यूटी भरली असल्याचे समोर आले आहे. बच्चन यांनी डिसेंबर २०२० मध्ये ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या घराची किंमत ३१ कोटी रुपये आहे. पण एप्रिल २०२१मध्ये या घराचे रेजिस्टेशन करण्यात आला आहे. या प्रॉपर्टीसाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.

अमिताभ यांनी खरेदी केलेले हे घर २७व्या आणि २८व्या मजल्यावर असून ५१८४ क्वेअर फीट आहे. तसेच त्यांना ६ गाड्या पार्किंगची जागा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी नवे घर खरेदी करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *