मनोरंजन

सलमानचा कट्टर शत्रू असलेल्या अभिनेत्यासोबत भाऊ अरबाजची हातमिळवणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा कट्टर शत्रू असलेला विवेक ओबरॉयसोबत सलमानचा भाऊ अरबाज खान याने हातमिळवणी केली आहे. सलमान आणि विवेक ओबेरॉय यांच्यामधील वाद प्रत्येकाला ठाऊक आहे. दोघांमध्ये अद्यापही ३६चा आकडा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे स्टार एकमेकांसोबत बोलत देखील नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अरबाज खान आणि विवेक ओबरॉय एकत्र काम करताना प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. बॉलिवूड लाईफने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार हे दोन कलाकार एकाच चित्रपटात दिसणार आहेत. अरबाज खान आणि विवेक ओबरॉय ‘रोसी- द सॅफरन चॅप्टर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. चित्रपटामध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. १८ वर्षाच्या रोसी नावाच्या मुलीची भूमिका पलक साकारताना दिसणार आहे. जी अचानक गायब होते. एकंदर सांगायचं झालं तर चित्रपटाची कथा हॉरर असणार आहे.

चित्रपट निर्माती प्रेरणा अरोराने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘मला फार आनंद होत की आमच्या चित्रपटात अरबाज खानची एन्ट्री झाली आहे. तो एक उत्तम दिग्दर्शन आणि निर्माता आहे. या चित्रपटाचे काम सुरू करण्यासाठी आम्ही फार उत्साही आहोत. पण अरबाज आल्यामुळे उत्साहात भर पडल्याचं देखील प्रेरणाने सांगितलं.