‘या’दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा बेल बॉटम
मनोरंजन

‘या’दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा बेल बॉटम

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. यापूर्वी अक्षय कुमारचा बेल बॉटम हा चित्रपट २ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट २७ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जॅकी भगनानी आणि अक्षय कुमारने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत बेल बॉटम हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये २७ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. जॅकी भगनानीने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत अखेर प्रतिक्षा संपली! बेल बॉटम हा चित्रपट २७ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे या आशयचे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आहे. येत्या काळात सूर्यवंशी, पृथ्वीराज, बच्चन पांडे, अतरंगी रे, धूम4 आणि बेलबॉटम हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.