दोन घटस्फोटानंतर तिसऱ्यालाही घटस्फोट देणार ‘ही’ अभिनेत्री
मनोरंजन

दोन घटस्फोटानंतर तिसऱ्यालाही घटस्फोट देणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : लोकप्रिय बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीय. श्राबंती तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. श्राबंती पहिल्यांदा घटस्फोट घेत नसून या आधी तिने दोन वेळा घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आता ती तिसरा पती रोशन सिंह यांच्यापासूव विभक्त होणार आहे. यासाठी तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२००३ सालामध्ये श्राबंतीने फिल्म मेकर राजीव कुमार यांच्याशी पहिला विवाह केला होता. २०१६ मध्ये ती राजीव यांच्यापासून विभक्त झाली आणि तिने मॉडल कृष्ण व्रजशी लग्न केलं. मात्र हे लग्न फक्त एक वर्ष टिकलं. तर २०१९ सालामध्ये श्राबंतीने रोशल सिंह यांच्याशी विवाह केला होता. हे तिचं तिसरं लग्न होतं. एका संकेतस्थाळाला दिलेल्या मुलाखतीत श्राबंतीचे पती रोशन सिंग यांनी श्राबंती मित्र परिवारात त्यांची बदनामी करत असल्याता दावा केला आहे.

रोशन खूप जाड असल्याचं ती इतर लोकांमध्ये सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोशन सिंह जाड असल्याने तिच्यासोबत सेक्स करत नाहीत आणि म्हणून त्यांच्यापासून विभक्त व्हायचं आहे. असं श्राबंती मित्रांना सांगून बदनामी करत असल्याचा खुलासा रोशन सिंह यांनी केला आहे. याशिवाय श्राबंतीवर तिचे पती रोशन सिंह यांनी अनेक आरोप केले आहेत. एक्स गर्लफ्रेण्डला कॉल करून ती अनेक तक्रारी करत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.