मनोरंजन

विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई : विनोदी मराठी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भूषण कडूच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. दवाखान्यात उपचारादरम्यान कादंबरी यांनी ३९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर कांदबरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दूर्दैवाने २९ मेला कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण आणि कादंबरी यांना प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे. भूषण आणि त्याच्या संपूर्ण कुंटबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

भूषणत्या पत्नीच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे. कांदबरी ही भूषणची दुसरी पत्नी होती. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अभिनेता भूषण कडू सहभागी झाला होता. यावेळी त्याची पत्नी कादंबरी आणि मुलगा भूषणच्या भेटीला आले होते. यावेळी बऱ्याद दिवसांनी आपल्या मुलाला पाहून भुषणच्या अश्रुंचा बांध फुटला होता. हा एपिसोड पाहून चाहते देखील भावूक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *