वाढदिवस विशेष : स्मिता पाटील; संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या
मनोरंजन

वाढदिवस विशेष : स्मिता पाटील; संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या

अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. आज त्यांचा जन्मदिवस. स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपटातील त्यांची कारकीर्द केवळ दहा वर्षांची असली तरी स्मिता केवळ अविस्मरणीय राहिली आहे. मात्र त्या पूर्वीच म्हणजे वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी १९७०मध्ये स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु, त्यांना उपजत अभिनयाची ओढ होती. अभिनयाच्या आवडीनं त्यांना शांत बसू दिलं नाही. वृत्‍तनिवेदिका म्‍हणून काम करत असताना श्‍याम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

पहिल्‍याच चित्रपटातील त्यांच्‍या अभिनयाचे कौतुक झाले. त्‍यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या अभिनयातला सच्चेपणा प्रेक्षकांना भावला. पडद्यावरील सौंदर्यांच्या साचेबद्ध कल्पना त्यांनी दुय्यम ठरवल्या. हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. १९७०-८० च्या दशकात समाजातील अनेक प्रश्‍नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले. मुळात स्मिता या एका सुशिक्षीत तसेच समाजवादी कुटुंबातून आल्‍यामुळे त्यांना सामाजिक प्रश्‍नांविषयी कळवळा होता.

अवघ्या दहा वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये स्मिता यांनी तब्बल ८० चित्रपट केले. त्यात ‘निशान्त’, ‘चक्र’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘गमन’, ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘अर्थ’, ‘बाज़ार’, ‘मंडी’, ‘मिर्च मसाला’, ‘अर्धसत्य’, ‘शक्ति’, ‘नमक हलाल’, ‘अनोखा रिश्ता’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

चित्रपटात पदार्पणाच्या चार वर्षांनंतर १९७७मध्ये ‘भूमिका’ चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर १९८०मध्ये ‘चक्र’साठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी १९८५ मध्ये त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणा-या स्मिता या जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या.

स्मिता यांचं लग्न हा देखील चर्चेचा विषय ठरला होता. स्मिता या राज बब्बर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. याच निर्णयामुळं, स्मिता आणि राज यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. स्मिता यांच्या घरातून देखील राज यांच्यासोबतच्या नात्याला सुरुवातीला विरोध होता. राज बब्बर विवाहित होते. त्यांचा नादिरा बब्बर यांच्याशी विवाह झाला होता. पण स्मितांसाठी राज यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनंतर स्मिता आणि राज यांनी लग्न केलं.

२८ नोव्हेंबर १९८६ मध्ये प्रतीकचा जन्म झाल्यानंतर काहीच दिवसांतच म्हणजे १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता यांनी अवघ्या ३१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर मृतदेह एखाद्या सवाष्ण महिलेप्रमाणं सजवला जावा, अशी स्मिता यांची इच्छा होती. त्याप्रमाणं निधनांतर त्यांची अखेरची इच्छा पूर्ण केली गेली. त्यांचे मेकअपमन दीपक सावंत यांनी त्यांच्या मृतदेहाचा सवाष्ण महिलेप्रमाणं मेकअप केला होता.

आज रपट जाएँ तो हमेंं ना उठई यों (हिंदी), आपकी याद आती रही रातभर (हिंदी), तुम्हारे बिना जी ना लागे घर में (हिंदी), दिखाई दिए यूँ के (हिंदी), साजन के गुण गाये (हिंदी), सावन के दिन आये (हिंदी), गगन सदन तेजोमय (मराठी) , जांभूळ पिकल्या झाडाखाली (मराठी), मी रात टाकली (मराठी)