धक्कादायक ! ‘या’ अभिनेत्रीच्या मॅनेजरकडून तब्बल २०० किलो गांजा जप्त
मनोरंजन

धक्कादायक ! ‘या’ अभिनेत्रीच्या मॅनेजरकडून तब्बल २०० किलो गांजा जप्त

मुंबई : एनसीबीनं एक कारवाई केली असून या कारवाईमध्ये बांद्रा येथून एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आला आहे. ती व्यक्ती अभिनेत्री दिया मिर्झाचा एक्स मॅनेजर असून त्याच्याकडून तब्बल २०० किलो गांजा जप्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राहिला फर्निचरवाला असे अटक करण्यात आलेल्या मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासहित आणखी चार व्यक्तिंनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये राहिलाची बहिण शाईस्ता आणि दोन ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे.

डीएनएकडून मिळालेल्या माहितीनुसार राहिला फर्निचरवाला आणि त्याची बहिण शाईस्ता यांच्या जवळ गांजा मिळून आला. सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे, एनसीबीनं जे कारवाई केली त्यात बांद्रा येथून एका कुरियरमधून गांजा जप्त करण्यात आला होता. याशिवाय जसवंत हाईटस जे खार येथे आहे तेथील नागरिक करण सजनानी (ब्रिटीश नागरिक) यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.

या लोकांकडून गांजा जप्त करण्यात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राहिला फर्निचरवाला आणि त्याची बहिण शाईस्ताच्या घरातून 200 किलो गांजा जप्त करण्यात आला. अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण पुढे आला होता. यानंतर बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. यात अनेक सेलिब्रेटींची नावे समोर आली होती. सुशांतच्या तपासानं घेतलेल्या वेगळ्या वळणानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अजूनही हे प्रकरण काही शांत झालेले नाही. त्यात दरवेळी नवनवीन नावे पुढे येत आहेत.