दिशा पाटनीसोबतच्या ब्रेकअपवर टायगरकडूनच शिक्कामोर्तब? ही अभिनेत्री आवडत असल्याचं केलं मान्य
मनोरंजन

दिशा पाटनीसोबतच्या ब्रेकअपवर टायगरकडूनच शिक्कामोर्तब? ही अभिनेत्री आवडत असल्याचं केलं मान्य

मुंबई: टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी (Tiger Shroff and Disha Patani) यांच्या रिलेशनशिपची चर्चा बॉलिवूडमध्ये गेल्या दीर्घकाळापासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी टायगर आणि दिशा यांचे मार्ग वेगळे झाल्याची बातमी धडकली. आता सेलिब्रिटींच्या पॅचअप इतक्याच त्यांच्या ब्रेकअपच्याही अनेकदा अफवा असतात. त्यामुळे चाहत्यांना असं वाटत होतं की टायगर आणि दिशा यांच्यातील ब्रेकअपच्या बातम्या फक्त अफवा असेल, पण आता मात्र खुद्दा टायगरनेच यावरच मौन सोडलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

करण जोहरच्या (Tiger Shroff in Koffe With Karan 7) कॉफी विथ करण शोच्या सातव्या सीझनमध्ये टायगर आणि दिशा यांच्या संपलेल्या नात्याविषयी टायगरने खुलासा केला आहे. त्यामुळे आता या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

रण जोहरचा कॉफी विथ करण हा शो सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींकडून खाजगी आयुष्यातील खळबळजनक गोष्टी काढून घेण्यात करण पटाइत आहे. कॉफी विथ करणच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये या शोमध्ये टायगर श्रॉफ त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन हिच्यासोबत सहभागी झाला होता. या शोमध्ये करण कलाकारांना त्यांच्या लव्हलाइफबद्दल बोलतं करत असतो, त्यामुळे टायगरलाही त्याने काही प्रश्न विचारले.

कॉफी विथ करण शोमध्ये करणने टायगरला दिशाविषयी विचारलं असता टायगर म्हणाला, मला असं वाटतय की सध्या मी सिंगल आहे. सध्या तरी मी डेट करण्यासाठी गर्लफ्रेंडच्या शोधात आहे. आता यावरून तरी दिशासोबत त्याचं ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म आहे, पण पुढे टायगर जे म्हणाला त्यानंतर प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या. श्रध्दा कपूरकडे मी सुरूवातीपासूनच आकर्षित होत आलो आहे, ती ग्रेट आहे. टायगरच्या या उत्तराने त्याच्या नव्या रिलेशनशिपची सुरूवात तर नाही ना?

दिशा आणि टायगर यांच्यातील अफेयर गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू होतं. अनेक पार्टी आणि सुट्टीसाठी ही जोडी एकत्र फिरत होती. चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडत होती. पण आता टायरनेच दिशा आणि त्याच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. जर ही माहिती खरी असेल तर चाहत्यांना निराश करणारी बातमी आहे.