सोशल मीडियावर फक्त शाहरुख खानच्या ‘पठाण’ची हवा, ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले-‘वनवास संपला!’
मनोरंजन

सोशल मीडियावर फक्त शाहरुख खानच्या ‘पठाण’ची हवा, ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले-‘वनवास संपला!’

मुंबई : शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात ट्रेलरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांबरोबरच त्याचे विरोधक देखील या सिनमाच्या ट्रेलरची आतुरतेनं वाट बघत होते. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्या संदर्भातील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जॉन अब्राहम खलनायक

पठाण सिनेमाचा ट्रेलर आज सकाळी ११ वाजता प्रदर्शित झाला. या सिनेमावरून गेल्या काही दिवसांपासून खूपच वादंग उठला होता. त्या वादामुळे ट्विटरवर देखील या सिनेमाची चर्चा होती. आता देखील ट्विटरववर #PathaanTrailer ट्रेंडिग होत आहे. आता ट्रेलर पाहिल्यावर लोकांनी त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केल्या आहेत. अनेकांना शाहरुख खानचा देशभक्ताची भूमिका आवडली आहे. या सिनेमात जॉन अब्राहम हा खलनायकाच्या भूमिकेत आहे.

शाहरुख खाननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवर सिनेमाचा ट्रेलर शेअर केला. हा ट्रेलर शेअर करताना लिहिलं की, ‘तुमचा पाहुणाचार करण्यासाठी पठाण येत आहे. बरोबर फटाकेही घेऊन येत आहे…’ हा सिनेमा हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

या सिनेमातून शाहरुख खान सुमारे चार वर्षानंतर प्रमुख भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते खूपच आनंदित झाले आहेत. पठाण सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्याची आतुर असल्याचं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘केवळ शाहरुख खानच बॉलिवूडला पुन्हा चांगले दिवस दाखवू शकतो. पुन्हा एकदा जगावर राज्य करण्यासाठी किंग परत येत आहे.’

तर अन्य नेटकऱ्यानं लिहिलं की, ‘देशानं त्याच्यासाठी काय केलं हे सैनिक विचारत नाही. तर तो विचारतो की देशासाठी तो काय करू शकतो. जय हिंद..वातावरण बिघडलं आहे…’

२५ जानेवारीला होणार रिलीज

ट्विटरवर नेटकरी सातत्यानं सिनेमाच्या ट्रेलरचं भरभरून कौतुक करत आहेत. त्यांना सिनेमाचा ट्रेलर खूपच आवडला आहे. काहींनी तर ट्रेलरचं कौतुक करायला शब्दच सुचत नसल्याचं म्हटलं आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.