मनोरंजन

पाच हजाराहून कमी किमतीत खरेदी करा सॅमसंगचे ‘हे’ स्मार्टफोन

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगकडून दोन फोन स्वस्त करण्यात आले आहे. भारतात सॅमसंग गॅलेक्सी कोअर एम 01 (Samsung Galaxy M01 Core) आणि सॅमसंग गॅलेक्सी कोअर एम 01 एस (Samsung Galaxy M01s) च्या फोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. तसेच, जुलै मध्ये लाँच करण्यात आलेल्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये आता ५०० रुपयांची कपात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

91 मोबाईल्स’ने (91Mobiles) ने रिटेल सोर्सेजच्या हवाल्याने कन्फर्म केले आहे की, Samsung Galaxy M01 Core च्या १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपयांऐवजी चार हजार ९९९ रुपये झाली आहे. तर गॅलेक्सी M01 Core च्या २ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ६ हजार ४९९ रुपयांऐवजी पाच हजार ९९९ रुपये झाली आहे. तर Samsung Galaxy M01s च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ९९९९ रुपयांऐवजी ९ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी कोअर एम 01 वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ५.३ इंचाचा HD+ TFT डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek MT6739 प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी पर्यंत स्टोरेजच्या या फोनमध्ये अँड्रॉयड 10 Go Edition दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 3000mAh बॅटरी दिली आहे. स्वस्त फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी कोअर एम 01 एस ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.२ इंचाचा HD+ TFT इनफिनिटी-V डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सोबत आहे. फोनमध्ये MediaTek Helio P22 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ड्यूल कॅमेरा दिला आहे.यात ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत