चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
मनोरंजन

चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई : चला हवा येऊ द्या मधील अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या सिरियलमधील अभिनेता अंकूर वाढवे नुकताच बाबा झाला असून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चला हवा येऊ द्यामध्ये कधी लहान मुलाची, तर कधी स्त्रीची भूमिका साकारत अंकूरने प्रेक्षकांचं मनापासून मनोरंजन केलं. त्यामुळे आज तो तुफान लोकप्रिय आहे. त्यातच आता त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. अंकूर आणि त्याच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. अंकूरने ही गोड बातमी शेअर केल्यावर त्याच्यावर चाहते व सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, अंकूर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय विनोदवीर आहे. चला हवा येऊ द्याच्या मंचावर त्याने चांगलीच धमाल उडवून दिली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत आहे.