Salman-Khan
मनोरंजन

‘बिग बॉस 14’मध्ये जाणाऱ्या स्पर्धकांना ‘कोरोना’चा बसणार फटका!

मुंबई : प्रसिद्ध शो ‘बिग बॉस 14’ लवकरच सुरु होणार आहे. मात्र, आता त्या शोची चर्चा सुरु आहे. या शोबद्दल दररोज काही ना काही बातम्या येतच आहेत. आता स्पर्धकांच्या एंट्रीबाबत मोठा बदल झाला आहे. या शोमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक प्रतिस्पर्धीचे किंवा स्पर्धकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘बिग बॉस 14’ या शोची मोठी तयारी सुरु आहे. पण कोरोनाचे संकट असल्याने विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. त्यानुसार, प्रत्येक स्पर्धकाला कोरोनाची चाचणी करवून घ्यावी लागणार आहे. याशिवाय घरात येण्यापूर्वी क्वारंटाईन किंवा विलगीकरण करावे लागणार आहे. सर्व स्पर्धकांना प्रीमियरच्या तारखेपूर्वी स्पर्धकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धकांना 20 किंवा 21 सप्टेंबरपासून क्वारंटाईन राहावे लागणार. हे सर्व स्पर्धक शोचे प्रीमियर होईपर्यंत क्वारंटाईनच राहणार आहेत.

14 ऑक्टोबरपासून शोची सुरुवात

‘बिग बॉस 14’ या शोची सुरुवात ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. या प्रीमियर भागांची शूटिंग तीन दिवसांपूर्वीच होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत