कंगनाला अटकपूर्व जामीन मंजूर; मात्र…
मनोरंजन

कंगनाला अटकपूर्व जामीन मंजूर; मात्र…

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्री कंगना राणावतला गुरुवारी (ता. २५) जामीन मंजूर केला. आदेश देऊनही कंगना गैरहजर राहिल्यामुळे अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. न्यायालयाने गुरुवारी तिला रोख २० हजार रुपये, तर १५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर कंगनाच्या आरोपांमुळे आपली नाहक बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे, असा आरोप अख्तर यांनी केला होता. तसेच कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मानहानीची तक्रार केली होती.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाही सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर तिने अख्तर यांच्यावर हे आरोप केले होते.