मनोरंजन

कंगनाकडून दादासाहेबांचा उल्लेख बाबासाहेब; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत सध्या तिच्या ट्विटमधून वारंवार राज्यसरकारवर निशाणा साधत आहे. ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडत असून आपल्यावर होणाऱ्या टीका आणि आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. मात्र आता एकापाठोपाठ ट्विट करणे तिच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे. एका ट्विटला उत्तर देताना कंगनाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब फाल्के असा केला आहे. यामुळे आता नेटकाऱ्यानी तिला चांगलंच फैलावर घेतले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मनीष अग्रवाल यांनी ट्विट करत कंगनावर निशाणा साधला. ” तुम्ही सर्वांवर निशाणा साधत पुढची वाटचाल करु इच्छित आहात.पण करण जोहर असो किंवा अन्य कोणी निर्माता…सर्वांच्या मेहनतीने भारतीय चित्रपटृष्टी उभी राहिली आहे. कोणतीही इंडस्ट्री तुमच्याप्रमाणे सर्वांना शिव्या देत १-२ दिवसांत उभी राहत नाही,” असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.

या ट्विटला कंगनाने ट्विट करून उत्तर देताना तिने दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला. कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्याच्या वडिलांनी उभी केलेली नाही. बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने उभी केली आहे. त्या जवानाने ज्याने सीमेचं रक्षण केलं, त्या नेत्याने ज्याने राज्यघटनेची सुरक्षा केली आहे, त्या नागरिकाने ज्याने तिकीट खरेदी करुन दर्शकाची भूमिका निभावली. इंडस्ट्री कोट्यवधी भारतीयांनी उभी केली आहे”. यावर अनेक नेतकऱ्यानी कंगनाला चांगलेच धारेवर धरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत