RJ-Malishka
मनोरंजन

झी मराठीवर येतोय नवा रिऍलिटी शो; RJ मलिष्का असणार परीक्षक

मुंबई : ‘झी मराठी’वर लवकरच एक नवा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डान्सिंग क्वीन साईज, लार्ज फुल चार्ज’ हा शो लवकरच येत आहे. येत्या 24 सप्टेंबरपासून हा डान्सिंग रिऍलिटी शो येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनेता आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या स्पर्धेचे नृत्यदिग्दर्शन ओंकार शिंदे करणार आहेत. तर या वजनदार स्पर्धकांचे परीक्षण सोनाली कुलकर्णी आणि RJ मलिष्का करतील. 15 वर्ष आणि त्यावरील मुली आणि महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत. यातील महत्ताची बाब म्हणजे ज्यांचे वजन 70 किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे या स्पर्धेत दिसणार आहेत.

‘डान्सिंग क्वीन साईज, लार्ज फुल चार्ज’  या रिऍलिटी शोच्या माध्यमातून RJ मलिष्का पहिल्यांदाच परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा रिऍलिटी शो 24 सप्टेंबरपासून गुरुवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत