दिपीका एका जहिरातीसाठी घेते तब्बल एवढं मानधन
मनोरंजन

दिपीका एका जहिरातीसाठी घेते तब्बल एवढं मानधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले, त्यानंतर दीपिकाने आज अफाट यश, संपत्ती मिळवली आहे. विशेष म्हणजे अनेक जाहिराती, चित्रपटांमध्ये झळकलेली दीपिका केवळ लोकप्रियतेमध्येच आघाडीवर नाही. तर संपत्तीच्या बाबतीतदेखील ती आघाडीवर आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपट, जाहिरातींमधून उत्पन्न मिळवणाऱ्या दीपिकाचा ब्रॅण्ड व्हॅल्युदेखील सर्वाधिक असल्याचं सांगण्यात येतं. ‘बिझनेस पोर्टल सीए नॉलेज’नुसार, दीपिका एका जाहिरातीसाठी तब्बल ८ कोटी रुपये घेते. दीपिकाच्या एकूण कमाईमध्ये तिचा ब्रॅण्ड एंडोर्समेंटची भूमिका महत्त्वाची आहे. मागील तीन वर्षांमध्ये तिच्या एंडोर्समेंटच्या कमाईत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. तिचं नेटवर्थ जवळपास १०३ कोटी रुपये आहे.

जाहिरातींप्रमाणेच दीपिका चित्रपटांसाठीदेखील अफाट मानधन घेते. एका चित्रपटासाठी ती १३ ते १५ कोटी रुपये घेते. दरम्यान, दीपिका तनिष्क, ओपो,नेस्ले फ्रूट व्हिला, लॉरिअल, रिलायन्स जियो, अ‍ॅक्सिस बँक, गुवार लाइटिंग नेसकॅफे, केलॉग्स, विस्तारा एअरलाईन्स,लक्स,जिलेट, ब्रिटानिया, गोआईबीबो या सारख्या बड्या ब्रॅण्डच्या जाहिरातींमधून पैसे कमावते.