दिया मिर्झाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; मिळाला चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार
मनोरंजन

दिया मिर्झाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; मिळाला चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाला चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्डने गौरविण्यात आलं आहे. पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी दियाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ३० सप्टेंबरला मुंबईतील ताज महाल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दियाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत सरकारच्या इंटरॅक्टीव फोरम ऑन इंडियन इकॉनमी संस्थेच्या वतीने दिया मिर्झाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यातील दिया मिर्झाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

२०१७ सालामध्ये दिया मिर्झाची संयुक्त राष्ट्र पर्यावरण सद्भावना राजदूत म्हणून निवड झाली आहे. या पदी तिचा कार्यकाळ २०२२ सालापर्यंत वाढवण्यात आलाय. पर्यावरण संरक्षण आणि संबंधित समस्यांवर जागरूकता पसरवण्याचं काम ती करते. समाज हितासाठी प्रयत्न करणाऱ्या विविध क्षेत्रातील ११५ लोकांची चॅम्पियन्स ऑफ चेंज या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.