अ मॅरिड वूमन या तारखेला होणार रिलीज, टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ
मनोरंजन

अ मॅरिड वूमन या तारखेला होणार रिलीज, टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

मुंबई : २०२० मध्ये अल्ट बालाजीने त्यांच्या आगामी अ मॅरिड वूमन या सीरिजची घोषणा केली होती. त्यानुसार, आता या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून टीझरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांच्या बेस्टसेलर ठरलेल्या अ मॅरिड वूमन या कादंबरीवर आधारित ही सीरिज असून या सीरिजचं पहिलं पोस्टर आणि टीझर एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अ मॅरिड वूमन या सीरिजची कथा आस्था या पात्राभोवती फिरताना दिसते. कर्तव्य आणि इतरांसाठी सतत धावपळ करणारी स्त्री स्वत:च अस्तित्व विसरत चालली आहे. यावर या सीरिजमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

https://twitter.com/ektarkapoor/status/1359127948855451652

दरम्यान, या सीरिजमध्ये रिधी डोगरा, मोनिका डोगरा,इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर, सुहास आहुजा ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.