शाहरुखसोबत काम करणारी अभिनेत्री कोरोनानंतर देतेय अर्धांगवायूशी झुंज
मनोरंजन

शाहरुखसोबत काम करणारी अभिनेत्री कोरोनानंतर देतेय अर्धांगवायूशी झुंज

मुंबई : अभिनेता शाहरुख खान बरोबर फॅन सिनेमात काम करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. कोरोनाला तिने हरवलंच होतं, तोपर्यंत आणखी एक धक्कादायक घटना घडली. कोरोनाला हरवल्यानंतर तिला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला. या आजारातून शिखा मल्होत्रा बरी होत आहे पण तिची रिकव्हरी अतिशय संथपणे चालू आहे. स्वत:च्या पायावर उभं राहता येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिखाने फॅन सिनेमात तिने शाहरुखबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. त्याचबरोबर संजय मिश्रा यांच्या 2019 साली आलेल्या ‘कांचली’ या सिनेमात देखील तिने महत्त्वाचे काम केले होते. तर तापसी पन्नू बरोबर तिने ‘रनिंग शादी डॉट कॉम’ मध्ये काम केलं आहे. शिखा ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची शिकार झाली होती. 22 ऑक्टोबरला तिला डिस्चार्ज मिळाला होता. काही महिन्यातच पुन्हा एकदा अशी धक्कादायक घटना घडली.

शिखा एक सर्टिफाइड नर्स आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच तिने रुग्णसेवेचाही वसा घेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील हिंदू हृदयसम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करत होती. सहा महिने तिने ही सेवा केली. त्यावेळीच तिला कोरोनाची लागण झाली होती.