Sen
मनोरंजन

सुष्मिता बॉयफ्रेंड रोहमनसोबत कधी करणार लग्न? तर हे पाहा त्याचं उत्तर…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल या दोघांचे प्रेमसंबंध सर्वांनाच परिचयाचे आहेत. पण आता याच संदर्भात मोठी चर्चा सुरु आहे. सुष्मिता आणि रोहमन या दोघांच्या लग्नाची चर्चा सध्या सुरु आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुष्मिता सेन हिच्या एका चाहत्याने तिला रोहमनसोबत विवाह कधी करणार? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी सुष्मिता सेनने उत्तर दिले. ती म्हणाली, रोहमनला विचारा लग्न कधी करणार. यावर रोहमन ‘विचारून सांगतो..’ असं म्हणत दोघांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

Sushmita Sen on quarantining with boyfriend Rohman Shawl, daughters amid  coronavirus lockdown

सुष्मिता सेन सध्या चित्रपटात भूमिका बजावताना दिसत नाही. पण तिची मुलगी रिनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुष्मिताची मुलगी रिनी 21 वर्षांची असून ती  ‘सुट्टाबाजी’  नावाच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रिनीच्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक कबीर खुराना यांच्या खांद्यावर आहे. ‘सुट्टाबाजी’ चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत