म्हणूनच फँड्रीच्या शालूला नागराज मंजुळे पुन्हा चान्स देईनात…
मनोरंजन

म्हणूनच फँड्रीच्या शालूला नागराज मंजुळे पुन्हा चान्स देईनात…

नागराज मंजुळेंचा ‘फँड्री’ हा त्यांच्या उत्तम सिनेमांपैकी एक सिनेमा. या सिनेमातील कलाकारांना लोकप्रियताही मोठ्या प्रमाणात मिळाली. जब्याची भूमिका करणारा सोमनाथ अवघडे आणि शालू साकारणारी राजेश्वरी खरात विशेष लोकप्रिय झाले. जब्या-शालूची जोडीही प्रेक्षकांना आवडली. दरम्यान शालू अर्थात राजेश्वरी सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. ती तिचे रील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असणारी राजेश्वरी तिच्या प्रोफाइलवर अनेक रील्स शेअर करते. मात्र तिने अलीकडेच शेअर केलेला एक व्हिडिओ तिच्या ट्रोलिंगचं कारण ठरला. या व्हिडिओमध्ये राजेश्वरीने नोरा फतेही ‘डर्टी लिटल सीक्रेट’ गाण्यावर डान्स केला. यामध्ये तिचे दोन लूक पाहायला मिळाले. एका लूकसाठी तिने क्रॉप टॉप आणि जीन्स असा आउटफिट कॅरी केला आहे, तर दुसऱ्या लूकसाठी तिने डीप नेक वनपीस परिधान केला आहे.

https://www.instagram.com/reel/Co4NBhAgeZi/?utm_source=ig_embed&ig_rid=43af71a7-305b-4e22-ba2e-028dfc316410

नोरा फतेहीच्या या बोल्ड गाण्यावर राजेश्वरीच्याही बोल्ड डान्स मुव्ह्ज पाहायला मिळाल्या. तिच्या काही चाहत्यांनी जरी अभिनेत्रीचे कौतुक केले असले, तरी या व्हिडिओवर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. अनेकांना तिचा हा व्हिडिओ आवडलेला नाही.

काय म्हणाले युजर्स?

राजेश्वरीच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, ‘म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देईनात…’ तर अन्य एकाने लिहिले की, ‘हे असे चाळे चालणार नाहीत शालू’. आणखी एका युजरने राजेश्वरीच्या व्हिडिओवर कमेंट केली की, ‘शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं’, तर एका युजरने तिला ‘गावठी नोरा’ म्हटले आहे. ट्रोल्सनी केलेल्या अशा अनेक कमेंट्स आहेत. मात्र काहींनी तिच्या डान्सचे कौतुकही केले आहे. एकाने लिहिले की, ‘शालू नादखुळा’, तर अन्य एकाने तिला सर्वात आवडती अभिनेत्री म्हटले आहे.

नागराज यांच्या ‘फँड्री’ सिनेमातील शालूचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले होते. २०१३ साली आलेला हा चित्रपट हिट ठरला होता. या सिनेमातून नागराज यांनी त्यांच्या खास शैलीत ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव मांडलं आहे.