रिंकू राजगुरूचा नवा व्हिडीओ पाहताच चाहते झाले घायाळ
मनोरंजन

रिंकू राजगुरूचा नवा व्हिडीओ पाहताच चाहते झाले घायाळ

सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून यात तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत तिने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या व्हिडीओत ती दक्षिण भारतीय चित्रपटातील गाण्यावर चालताना दिसत आहे. या व्हिडीओतील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही करत आहेत.

https://www.instagram.com/p/CKN1I-2pq9a/?utm_source=ig_web_copy_link

रिंकू राजगुरू वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अॅमेझॉन प्राइमवर तिचा ‘अनपॉज्ड’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकूने भूमीला साकारली आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CKDyvIApjj-/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त इंग्लंड दौऱ्यावर असलेली अभिनेत्री रिंकू लंडनमध्येच अडकली होती. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.