तुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय
मनोरंजन

तुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयने रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ’ला चांगलेच फटकारले आहे. तसेच, दोन्ही वृत्तवाहिन्यांकडून करण्यात आलेलं वृत्तांकन प्राथमिकदृष्ट्या अवमानकारक आणि मुंबई पोलिसावंर करण्यात आलेली टीका अयोग्य असल्याचं मतही न्यायालयाने नोंदवलं आहे. माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करत सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मीडिया रिपोर्टिंगचं नियमन करा अशी मागणी केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकद दत्ता आणि जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. “माध्यमांनी चर्चा, गुन्हेगारी तपासासंबंधी वादविवाद अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. फक्त जनहितार्थ माहिती अहवालापुरतंच मर्यादित असावं. तसेच, रेकॉर्डवर ठेवण्यात आलेल्या गोष्टी लक्षात घेता टीव्ही मीडियाकडून मुंबई पोलिसांवर करण्यात आलेली टीका अयोग्य आहे. मुंबई पोलीस तपासाच्या अत्यंत पहिल्या टप्प्यावर होते,” असं उच्च न्यायालयाने यावेळी सांगितलं. त्याचबरोबर न्यायालयाने यावेळी वृत्तवाहिन्यांनी आपली सीमा ओलांडू नये अशा शब्दांत सुनावलं आहे.

तसेच, “जर तुम्हीच तपास करणारे, फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा? आम्ही येथे कशासाठी आहोत,” अशी विचारणा न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीची बाजू मांडणाऱ्या वकिलांना केली. “हा शोध पत्रकारितेचा भाग आहे का? लोकांना त्यांचं मत विचारणं आणि कोणाला अटक करायची?” अशी विचारणाही यावेळी न्यायालयाने केली.