मनोरंजन

मी माझ्या धर्मात उत्तर शोधलंय म्हणत अभिनेत्रीने सोडली फिल्म इंडस्ट्री

बिग बॉस फेम सना खानने बॉलीवूड इंडस्ट्री सोडली आहे. याबाबत तिनं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये सना इस्लामधर्मांबाबत बोलताना दिसते. आहे. यामध्ये सनाने प्रिंट केलेला स्कार्फ आणि लाइट मेकअप केला आहे. पण काही नेटकऱ्यांना तिचा हा लूक आवडला नाही, असे म्हणत त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर काहींनी बॉलीवूड सोडण्याच्या तिच्या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केले.
————-
आणखी वाचा :
अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी हृतिक रोशनचा पुढाकार
————-
मराठी व्याकरणाला तर्कशुद्ध करणारे तर्खडकर
————-

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये लिहिले की, आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलत आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आयुष्य जगत आहे. या काळात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला प्रसिद्धी, सन्मान आणि संपत्ती सर्व काही मिळाले. मी सर्वांची आभारी आहे.

सनाने तिच्या इंस्टाग्रामवरील सर्व जुन्या पोस्ट काढून टाकल्या आहेत. सना म्हणाली की काही दिवसांपासून मला असे वाटते की जगात येण्याचे उद्दिष्ट फक्त संपत्ती आणि किर्ती मिळवणे एवढेच आहे का? एखाद्याचं हे कर्तव्य नाही का की त्याने त्याचं आयुष्य अशा लोकांसाठी घालवावे, जे निराधार आहेत ? मृत्यू कधीही येऊ शकतो. मेल्यानंतर त्याचे काय होणार आहे ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय. जेव्हा मी माझ्या धर्मात याचं उत्तर शोधलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत