Model-Paula
मनोरंजन

फिल्ममध्ये रोल देतो म्हणून कपडे उतरविण्याची ठेवली होती अट; प्रसिद्ध दिग्दर्शकावर आरोप

मुंबई : देशात काही महिन्यांपूर्वी #MeToo या मोहिमेंतर्गत अनेक टीव्ही, बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाला वाचा फोडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मॉडेलने बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Sajid Khan once again accused of sexual harassment by Model Paula

पाऊला असे या मॉडेलचे नाव आहे. तिने साजिद खान यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याबाबतची इन्स्टाग्राम पोस्टच तिने लिहिली आहे. यामध्ये तिने लिहिले, की मी जेव्हा 17 वर्षांची होती,  तेव्हा भूमिका देण्याच्या बदल्यात साजिद खानने आपल्याला कपडे उतरविण्याची अट ठेवली होती. माझ्यासोबत साजिद खान अत्यंत घाणेरड्या गोष्टी बोलत असे. तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. त्याने मला त्याच्यासमोर कपडे उतरविण्यास सांगितले. त्याच्या बदल्यात तो त्याच्या आगामी चित्रपट ‘हाऊसफुल्लमध्ये रोल ऑफर केली होती.

साजिदला तुरुंगवासाची शिक्षा व्हावी

मी कोणाच्या सांगण्यावरून आपला आवाज उठवला नाही. पण माझ्यासोबत जेव्हा हे झालं तेव्हा मी लहान होते. त्यावेळी काही बोलता आलं नाही. मात्र, आता साजिदला तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत