केजीएफ-२ या तारखेला होणार रीलिज; ५ भाषांत होणार प्रदर्शित
मनोरंजन

केजीएफ-२ या तारखेला होणार रीलिज; ५ भाषांत होणार प्रदर्शित

मुंबई: केजीएफचा पुढचा सिक्वेल केजीएफ 2 कधी येणार याची प्रतीक्षा सर्वांना होती. नुकतीच त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. केजीएफ चॅप्टर २ हा चित्रपट 5 भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेतून प्रदर्शित होणार आहे. तर रॉकी या भागात आपला बदला आणि आईला दिलेलं वचन पूर्ण करणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अशा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या सिनेमामध्ये मुख्य भूमीकेत यश असणार आहे. तर संजय दत्त, रवीना टंडन देखील या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहेत. टीझरमध्ये या सर्वांना पाहता येणार असल्यानं आता सर्वांची प्रतीक्षा अगदी शिगेला पोहोचली आहे. 16 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा सिनेमा चित्रपटगृहात 16 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतकेच नाही तर ‘केजीएफ चॅप्टर 2’च्या टीझरने यूट्यूब व्ह्यूजच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत.

या सिनेमाचा टीझर आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाचे हिंदी हक्क विकत घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत घोषणा केली होती. या चित्रपटाचा पहिला भाग 2018मध्ये प्रदर्शित झाला होता. जो आजही सर्वांच्या मानावर अधिराज्य गाजवत आहे. पहिल्याप्रमाणेच दुसराही भाग बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक करेल असा विश्वास सर्वांना आहे.