जॅकलिनने शेअर केला फाटलेल्या ड्रेसमधील हॉट फोटो
मनोरंजन

जॅकलिनने शेअर केला फाटलेल्या ड्रेसमधील हॉट फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. पण फोटो निट पाहिल्यावर जॅकलिनचा ड्रेस थोडा फाटला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चुकून जॅकलिनने हा फोटो शेअर केला असावा असे म्हटले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जॅकलिन ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच जॅकलिनने एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो सध्या चर्चेत आहे. पण हा फोटो शेअर करत जॅकलिनने एक चूक केली आहे.

जॅकलिन लवकरच किक २, बच्चन पांडे आणि भूत पोलीस या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. लॉकडाउनच्या काळात ती अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर वेळ घालवत होती. त्यावेळी तिचे आणि सलमानचे गाणे प्रदर्शित झाले होते. त्यावेळी तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.