शेफाली जरीवालाचं सर्वात बोल्ड गाणं ‘काँटा लगा’ आठवतंय? अभिनेत्रीची अशी झालेली निवड, किती मिळाली होती फी?
मनोरंजन

शेफाली जरीवालाचं सर्वात बोल्ड गाणं ‘काँटा लगा’ आठवतंय? अभिनेत्रीची अशी झालेली निवड, किती मिळाली होती फी?

मुंबई : काही वर्षांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये जुनी गाणी रिमिक्स करण्याचा ट्रेंड होता. याचदरम्यान ‘काँटा लगा’ गाणंही रिलीज झालं होतं. या गाण्यात असलेली मॉडेल शेफाली जरीवाला आजही ‘काँटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाते. त्यावेळी शेफाली टीन एज गर्ल होती. या गाण्यानंतर ती एका रात्रीत स्टार झाली. गाणं रिमिक्स असूनही तिने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. पण तिला हे गाणं कसं मिळालं होतं? हे गाणं करण्यासाठी तिने फी घेतली होती?

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेफालीने हे गाणं तिला कसं मिळालं याचा किस्सा सांगितला होता. तिने सांगितलं, की ती आपल्या मित्रांसोबत कॉलेजच्या बाहेर उभी होती, त्याचवेळी तिला ‘काँटा लगा’ गाण्याच्या मेकर्सनी स्पॉट केलं. त्यांनी शेफालीला पाहिलं आणि त्याचवेळी हीच मुलगी आपल्या गाण्यासाठी परफेक्ट असल्याचं त्यांना वाटलं होतं.

गाण्यासाठी मेकर्सनी शेफालीची निवड केली असली, तरी तिच्यासाठी ही बाब अतिशय कठीण होती, कारण शेफालीच्या कुटुंबात सर्वजण उच्च शिक्षित होते. तिच्या कुटुंबात कोणी इंजिनिअर, तर कोणी डॉक्टर होते. अशात शेफालीला ‘काँटा लगा’ गाण्यासाठी परवानगी मागण्याची भीती वाटत होती. शेवटी नशिबात असतं, तेच घडतं. शेफालीच्या आईची या गाण्यासाठी मान्यता मिळाली, पण तिच्या वडिलांची परवानगी घेण्यासाठी या गाण्याच्या मेकर्सना पुढे यावं लागलं.

सिनेमाच्या ऑफर्स आल्या, पण…

‘काँटा लगा’ गाण्यानंतर शेफालीला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मात्र या सर्व ऑफर्स तिने नाकारल्या. कारण होतं वडिलांना दिलेलं वचन…’काँटा लगा’ गाण्यानंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्याचं तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं आणि तिनेही वडिलांना शिक्षण पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं. ‘काँटा लगा’ गाण्यानंतर शेफालीने सर्व सिनेमांच्या ऑफर्स नाकारुन शिक्षण पूर्ण केलं.

पहिल्याच गाण्यासाठी किती मिळाली होती फी?

शेफालीने तिच्या ‘काँटा लगा’ गाण्यानंतर अनेक अफवा पसरल्याचं सांगितलं. लोकांच्या बोलण्याचा, तिच्याबद्दल होणाऱ्या चर्चांचा तिच्यावर अतिशय परिणाम होत असल्याचंही ती म्हणाली. तिच्या भावाने तिची हत्या केल्याच्या अफवाही त्यावेळी होत्या. भावाने तिचं करिअर संपवलं असल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी लोकांमध्ये होणाऱ्या चर्चांचा, त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम होत होता, पण आता त्याचा कोणताही परिणाम माझ्यावर होत नसल्याचं ती म्हणते.

‘काँटा लगा’ गाणं रिलीज होण्याआधी शेफालीने कधीही या इंडस्ट्रीमध्ये कोणतंही काम केलं नव्हतं. शेफालीने केवळ आपल्या आवडीसाठी आणि लाइमलाइटसाठी हे गाणं केलं होतं. त्यामुळे अशा गाण्यासाठी किती फी मिळते याची तिला कोणतीही कल्पना नव्हती. शेफालीने सांगितलं, की तिला ‘काँटा लगा’ गाण्यासाठी ७००० रुपये फी म्हणून मिळाले होते.