वनिता खरातचं न्यूड फोटोशूट; सईनं केलं कौतुक
मनोरंजन

वनिता खरातचं न्यूड फोटोशूट; सईनं केलं कौतुक

मुंबई : मराठी अभिनेत्री वनिता खरातने न्यूड फोटोशूट केले आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने हा फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०१९मध्ये आलेल्या कबीर सिंग या सिनेमात मोलकरणीची छोटीशी भूमिका साकारणारी वनिता सगळ्यांच्याच लक्षात राहिली. मात्र, सध्या वनिताने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चर्चा सुरू आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वनिताने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केलं आहे. आपल्या वजनाचा आणि शरीराबद्दलचा कोणताही न्यूनगंड न बाळतगता वनिताने बोल्ड फोटो शेअर केला आहे. वनिताने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. मला माझ्या गुणवत्तेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीरावर अभिमान आहे. कारण मी मी आहे ! अशा भावना वनिताने व्यक्त केल्या आहेत.

तिचं मराठी कलाकारांकडून आणि सोशल मीडियावर कौतूक होत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही वनिताचं या फोटोशूटबद्दल कौतूक केलं असून तिने इन्स्टाग्रामवरून वनिताचा फोटो शेअर केला आहे. वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. नेहमीच नऊवारी साडीमध्ये फोटो काढणाऱ्या वनिताचा अशा प्रकारचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.