अभिनेता कमल हासनच्या पायावर शस्त्रक्रिया; श्रुती हसनची माहिती
मनोरंजन

अभिनेता कमल हासनच्या पायावर शस्त्रक्रिया; श्रुती हसनची माहिती

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता कमल हासनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. पायाच्या हाडात संसर्ग झाल्यामुळे ही शस्त्रक्रिया करावी लागली आहे. याविषयीची माहिती त्यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन हिने ट्विट करत दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यांच्या पायाच्या हाडामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सांगण्यात आली आहे. कमल हासन यांना चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. कमल हासन यांच्या पायाला काही वर्षांपूर्वी दुखापत झाली होती. त्यातच आता पायाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना ही शस्त्रक्रिया करावी लागली.

तुमच्य प्रार्थना आणि आशिर्वादाबद्दल धन्यवाद ! तुमच्या आशिर्वादाच्या जोरावर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे श्रुतीने ट्विटद्वारे म्हटले आहे. आम्ही चार ते पाच दिवसांत घरी येऊ असेही तिने म्हटले आहे.