कंगनाने थेट वडिलांनाच दिली होती धमकी; तुम्ही मला थप्पड माराल, तर…
मनोरंजन

कंगनाने थेट वडिलांनाच दिली होती धमकी; तुम्ही मला थप्पड माराल, तर…

आपल्या भूमिका चूक कि बरोबर याचा कोणताही विचार न करत आपली मते स्पष्टपणे आणि बेधडक मांडणारी अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच चर्चेत असते. शेतकरी आंदोलन असो वा महाराष्ट्र सरकार तिने आपल्या भूमिका अगदी स्पष्टपणे मांडल्या. आज सकाळी कॉंग्रेस नेते सुखदेव पानसे यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर कंगनाने आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. यावेळी तीने आपल्या वडिलांसोबत झालेल्या एका वादाचाही किस्सा सांगत, जेव्हा त्यांनी तिला थापड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काय घडले, हेही तिने सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंगनाने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे आहे की, “माझ्या वडिलांकडे रायफल आणि बंदूक होती, मी लहान असताना त्यांनी रागावले की, माझे पाय थरथर कापत. त्यांच्या काळात ते महाविद्यालयांत गँगवार करण्यासाठी प्रसिद्ध होते. यामुळे त्यांची ओळख गुंड अशी झाली होती. मी वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांच्यासोबत भांडून घर सोडले होते. अशा पद्धतीने मी 15 वर्षांच्या वयातच पहिली बंडखोर राजपूत महिला ठरले होते.”

आपल्या पुढच्या ट्वीट मध्ये कंगनाने आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. यात ती म्हंटले आहे, की “मी जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांना वाटत होते, की मला चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये शिकवून ते क्रांतीकारी वडिल होत आहेत. मात्र, जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, तुम्ही मला थप्पड माराल, तर मीही तुम्हाला थप्पड मारीन.”

पुढे कंगना म्हणाली, ही घटना आमच्यातील नात्याचा शेवट होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी केवळ माझ्याकडे माझ्या आईकडे बघितले आणि आपल्या रूममध्ये निघून गेले. मला माहित होते, की मी सीमा ओलांडली आहे, त्यानंतर मी त्यांना कधीच मिळवू शकले नाही. मी कायमची त्यांच्यापासून दुरावले गेले. मात्र, मी पिंजऱ्यात राहू शकत नाही आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मी काहीही करू शकत होते.” असेही तिने म्हंटले आहे.

तसेच, या चिल्लर इंडस्ट्रीला वाटते, की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात घुसले आहे आणि ते मला नीट करू शकतात. पण मी नेहमीच बंडखोर होते. यशामुळे फक्त माझा आवाज वाढला आहे आणि आज मी देशातील सर्वात महत्वाच्या आवाजांपैकी एक आहे. इतिहास साक्षी आहे, की ज्यांनी-ज्यांनी मला नीट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मीच नीट केले आहे.” असेही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.