सचिन वाझेची कसून चौकशी केली तर ठाकरे सरकार कोसळेल’
मनोरंजन

सचिन वाझेची कसून चौकशी केली तर ठाकरे सरकार कोसळेल’

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता यावरून अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कंगनाने ट्वीट करून ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा हल्ला चढवला आहे. माझ्या एक्स रेनुसार या मागे मोठे कट कारस्थान असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना सत्तेत येताच सचिन वाझेला निलंबित करण्यात आलं होतं. पण, नंतर त्यांचे निलंबन मागे घेत पुन्हा पदावर नियुक्ती केली गेली. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास गाडलेले मुडदेही बाहेर येतील. फक्त एवढचं नाही तर ठाकरे सरकारही कोसळेल, असं कंगना राणावतने ट्वीट केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणापासून अभिनेत्री कंगना राणावत महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि खास करून शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्र सरकारविरोधात बोलत असल्याने आता आपल्यावर आणखी २०० एफआयआर दाखल होऊ शकतात असं मला वाटतंय, असं कंगना राणावत म्हणाली.

कंगना राणावतवर काही दिवांसापूर्वी मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपिराईट प्रकरणी वांद्रे न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून खार पोलिसांनी कंगना राणावत, तिची बहिणी रंगोली चांडेल आणि भाऊ अक्षत राणावत यांच्यासह कमलकुमार जैना यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.