मुंबई: निर्माता-दिग्दर्शक करण जोहर या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याचे सिनेमे वादात अडकले आहे. पण आता करण जोहरच्या नावाचा वापर केल्यानं एक चित्रपट निर्माता वादात अडकला आहे. ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ असं एका सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची चर्चा सुरू आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोर्टानं स्थिगिती दिली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
करण जोहर याच्या याचिकेमुळं उच्च न्यायालयानं ‘शादी के डायरेक्टर करण और जोहर’ या सिनेमाच्या प्रदर्शनाला दिलेली स्थगिती शुक्रवारीही कायम ठेवली. स्थगिती उठवण्याची या सिनेमाच्या निर्मात्यांची विनंती न्या. रियाझ छागला यांनी फेटाळून लावली.
काय आहे नेमकं प्रकरण?
‘सिनेमाच्या या नावामुळं करण जोहर यांच्या व्यक्तित्वाच्या हक्कांचे प्रथमदर्शनी उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाला यापूर्वी दिलेली अंतरिम स्थगिती उठवता येणार नाही’, असं न्या. छागला यांनी स्थगिती कायम करताना आदेशात स्पष्ट केलं. अशा नावानं सिनेमा प्रदर्शित केला जात असल्याबद्दल करण जोहर यांनी ‘इंडियाप्राइड अडव्हायजरी’ व संजय सिंग आणि लेखक-दिग्दर्शक बबलू सिंग यांच्याविरोधात दावा दाखल केला. त्याविषयीच्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयानं १३ जून २०२४ रोजी प्रदर्शनाला अंतरिम स्थगिती दिली होती.
तसंच करण जोहरनं देखील या सिनेमात माझ्या नावाचा चुकीचा वापर करण्यात आला असून या सिनेमाशी माझा काहीच संबधं नसल्याचं स्पष्ट केलंहोतं. त्यामुळं निर्माते आता सिनेमाचं नाव बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, करण जोहरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर करण जोहरनं सैफ अली खान आणि अमृता सिंहचा मुलगा इब्राहिम अली खानला नादानिया या सिनेमातून लॉन्च केलं आहे. हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून करण त्याच्या कमी झालेल्या वजनामुळंही चर्चेत आहे. त्याचं वजन अचानक कमी झालं असल्यानं चाहत्यांनी त्याला त्याबद्दल विचारायाला सुरुवात केली होती. करण जोहरला गंभीर आजार झाल्या असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र फिटनेसच्या दृष्टीनं वजन कमी केल्याचं सांगितलं.