करीनाने चाहत्यांना दिला सुखद धक्का; सोशल मिडीयावर दाखवली छोट्या नवाबांची झलक
मनोरंजन

करीनाने चाहत्यांना दिला सुखद धक्का; सोशल मिडीयावर दाखवली छोट्या नवाबांची झलक

अभिनेत्री करिना कपूर खानने महिला दिनाचे औचित्य साधत छोटे नवाबची झलक दाखवत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. करिना कपूरने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सध्या ती तिच्या छोटे नवाबसह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. पण करीनाच्या छोट्या नवाबची एक झलक पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र अजूनपर्यंत बाळाची झलक पाहायला मिळाली नव्हती. अखेर महिला दिनानिमित्त करिनाने बाळाला कुशीत घेतल्याचा फोटो तिने शेअर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेअर केलेल्या फोटो बाळाचा चेहरा दिसत नसला तरी एक झलक पाहायला मिळाल्यामुळे चाहत्यांनीही कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या बघता, तूर्तास तरी मीडियासमोर न येण्याचा निर्णय करिना व सैफने घेतला आहे. त्यामुळे करीना एका व्हर्चुअल लाईव्ह व्हिडीओ कॉन्फीन्सद्वारे आपल्या बाळाची ओळख करुन देणार आहे. दुस-या मुलाला जगासमोर आणण्याची जबाबदारी करिनाची असेल. लवकरच बेबो सोशल मीडियावर मुलाचा फोटो आणि त्याच्या नावाचा खुलासा करणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे ते आपल्या दुस-या मुलाची एक झलक चाहत्यांना दाखवू शकतात.

करिना आणि सैफला बाळ झाल्यापासून त्यांच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे लाखो चाहते उत्सुक आहेत. मात्र करिना आणि सैफचे बाळ कसे दिसते, हे नुकतेच करिनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी सांगितले आहे. एका वृत्तपत्राला माहिती देताना रणधीर कपूर यांनी सांगितले की, सगळीच बाळं सारखीच दिसतात. त्यामुळे बाळ कोणासारखे दिसते हे मला सांगता येणार नाही. पण सगळ्यांचे म्हणणे आहे की, बाळ अगदी त्याच्या मोठ्या भावासारखे म्हणजेच तैमुर सारखे दिसते. छोट्या बाळाच्या आगमनामुळे तैमुर प्रचंड खूश झाला आहे.

दरम्यान, पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला त्यावेळी सैफ व करिना काही दिवसानंतरच कॅमे-यासमोर आले होते. तैमूरची झलक त्यावेळी पहिल्यांदा अख्ख्या जगाने पाहिली होती. पण यावेळी मात्र अद्याप तरी बेबोने आपल्या मुलाची झलक दाखवली नव्हती. शेवटी छोटे नवाबचा चेहरा दिसत नसला तरी झलक दाखवली आहे.