कंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?
मनोरंजन

कंगनावर चोरीचा आरोप, मिळाली कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवर एका लेखकाने चोरीचा आरोप केला आहे. मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटानंतर कंगनावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप केले. यामध्येच कंगनावर पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे. कंगनावर तिसऱ्यांदा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका लेखकाने कंगनावर पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Didda: The Warrior Queen Of Kashmir या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी कंगनावर आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा या सिक्वलची घोषणा केली आहे. हा चित्रपट काश्मीरमधील राणी दिद्दा यांच्या जीवनावर अवलंबून आहे. कंगनाने या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर आशिष कौल यांनी कंगनावर दिद्दा : द वॉरियर क्विन ऑफ काश्मीर या पुस्तकातून ही कथा घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी कंगनाला कायदेशीर नोटीसदेखील पाठवली आहे.

मी ज्या महिलेला राष्ट्रवादी समजत होतो, तिनेच माझी फसवणूक केली आहे. मी एक काश्मिरी ब्राह्मण आहे. मध्यंतरी कंगनाने ज्या प्रकारे काश्मिरी ब्राह्मणांचा मुद्दा उचलून धरला होता त्यावरुन तिला आमचं दु:ख समजत असेल असं वाटत होते. त्यामुळे काश्मिरी लोकदेखील तिला आदर देत होते. मात्र, ज्या पद्धतीने तिने माझी कथा चोरली आहे आणि मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून आम्ही चुकीच्या माणसाला आमचा हिरो समजत होतो असं वाटतंय, असं आशिष कौल म्हणाले.

दरम्यान, याप्रकरणी आशिष कौल यांनी कंगनाला कायदेशील नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी निर्माते, दिग्दर्शक केतन मेहता यांनीदेखील कंगनावर चोरीचा आरोप केला होता. मणिकर्णिका चित्रपटाची संकल्पना कंगनाने चोरल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच सिमरन चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनीही कंगनावर जबरदस्तीने पटकथा घेतल्याचा आरोप केला होता.