मनोरंजन

‘ही’ आहे पहिली भारतीय अभिनेत्री, तिच्या नावाने चाहत्यांनी बांधले मंदीर

अभिनेत्री-नेत्या-राजकारणी खुशबू यांनी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. २०१४ मध्ये खुशबूने डीएमके सोडले आणि त्या कॉंग्रेसमध्ये सामील झाल्या. पण आता त्या कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाते. चला जाणून घेऊ कोण आहेत. खुशबू ..

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

५० वर्षीय खुशबू यांचा जन्म मुंबईत झाला . त्याचे खरे नाव नखत खान आहे. हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणार्‍या खुशबू यशाच्या पायर्‍या चढत गेल्या. खुशबू यांचा पहिला चित्रपट ‘द बर्निंग ट्रेन’ हा होता. चित्रपटाच्या ‘तेरी है जमीन तेरा आसमान’ या गाण्यात त्या दिसल्या होत्या.

त्यानंतर त्यांनी कालिया, दर्द का रिश्ता, नसीब आणि लावरीस या चित्रपटांत काम केले. बॉलीवूडमधील खुशबू फारशा रमल्या नाहीत. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत सुमारे २०० चित्रपट केले आहेत. खुशबू तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील एक अतिशय प्रसिद्ध असा चेहरा आहे.

मंदिर असणारी पहिली भारतीय अभिनेत्री
खुशबू या चित्रपट क्षेत्रातील पहिल्या अभिनेत्री आहेत की त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे मंदिर बांधले. ११९० च्या दशकात जेव्हा खुशबूची कारकीर्द शिगेला होती. त्या काळात कलाकारांची मंदिरं बांधण्याचा कल होता. पण हा ट्रेंड फक्त कलाकारांसाठीच होता. त्यावेळी खुशबूच्या चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीचे मंदिर बांधून सर्वांना चकित केले. हे मंदिर तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमध्ये आहे.

इतकेच नव्हे तर तामिळनाडू आणि आसपासच्या राज्यांमध्येही खुशबूची अशी प्रचंड क्रेझ होती की विविध कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांची नावे त्याच्या नावाने सुरू केली. खुशबू इडली त्यावेळी अत्यंत लोकप्रिय झाली. याशिवाय खुशबू कॉफी, खुशबू झुमकी, खुशबू साडी, खुशबू शरबत, खुशबू कॉकटेल अशी अनेक उत्पादने प्रसिद्ध झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत