मनोरंजन

सुशांतच्या अखेरच्या चित्रपट दिल बेचारा’चा ट्रेलर बघून क्रितीने लिहीलं, ‘पाहणं कठीण आहे पण..”

मुंबईः सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ याचा ट्रेलर चाहत्यांना चांगलाच पसंद पडला आहे, ट्रेलर रिलीज झाल्यावरोबर युट्यूवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. त्यासोबतच बॉलिवुडमधील सुशांतचे सहकलाकार देखील त्याच्या या चित्रपटाची वाट पाहताना दिसून येत आहेत.’ राबता’ चित्रपटाच सुशांत शोबत मुख्य भुमिकेत असलेली क्रिती सेनॉनने ‘दिल बेचारा’चा ट्रेलर सोबत भावनिक संदेश पोस्ट केला आहे.

क्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर दिल बेचाराचा ट्रेलर शेअर केला, त्योसबतच तिने लिहीलं की, “दिल बेचारा हा चित्रपट पाहणं कठीण असणार आहे, पण मी पाहाणार नाही हे कसं शक्य आहे!”

क्रितीने या पुर्वी देखील सुशांतच्या आठवणीत बऱ्याच पोस्ट केल्या आहेत. तिने सुशांत सोबतचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. त्यासोबतच सुशांतच्या निधनानंतर सोशल मिडीयामध्ये सुरु असलेल्या चर्चांबद्दल देखील तीने पोस्ट लिहीली होती.

सुशांत सिंह राजपूतने मागील महिन्याच्या १४ तारखेला मुंबईतील त्याच्या आपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सुशांत मागील सहा महिन्यांच्या कालावधीपासूव डिप्रेशन मध्ये होता आणि त्यावर इलाज घेत होता अशी माहिती समोर आली आहे. पण सुशांतच्या डिप्रेशनचे कारण अद्याप माहित झालेले नाही. पोलीस आत्महत्येमागील कारणांचा तपास करत आहे.