दे धक्काचा पार्ट २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

दे धक्काचा पार्ट २ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सुदेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विनोदाने सजलेल्या या चित्रपटाचा दुसरा पार्टही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. दे धक्का २ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित, दे धक्का २, तारीख ठरली!!! १ जानेवारी २०२२… थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय या आशयाचे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे. दे धक्का २ लवकरच भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत.

दे धक्का हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या लिटिल मिस सनशाइन या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये क्रेझी कुटुंब म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते. त्यानंतर आता दे धक्का २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.