बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मलायका अरोडा गोव्याच्या बीचवर करतेय सुट्टी एन्जॉय
मनोरंजन

बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोबत मलायका अरोडा गोव्याच्या बीचवर करतेय सुट्टी एन्जॉय

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा नुकतेच गोव्याच्या बीचवर धमाल करताना दिसून आले. मलायका आणि अर्जुन आपली सुट्टी गोव्यातील अमृता अरोरा आणि तिचा नवरा शकील लडाकच्या आलिशान व्हिलामध्ये साजरा करत आहेत. अर्जुन कपूरनेही कॅन्डोलिम बीचवर असलेल्या अमृता अरोराच्या या व्हिलाचे कौतुक केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्जुन कपूरने व्हिलामधील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. हा आलिशान व्हिला खूपच सुंदर आहे. हा उबर लक्झरी 5 बीएचके पूल व्हिला आहे. फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले की, “जेव्हा तुझ्या मनाला घरी परत जायचे नसते तेव्हा … तुमचे घर खूप सुंदर आहे अमृता अरोरा आणि शकील लडाक. गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी यापेक्षा सुंदर घर दुसरे कोणतेही नाही. काय अप्रतिम घर आहे.” असेही अर्जुनने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटले आहे.

तर मलाइका अरोड़ा सोशल मीडियावर अमृताच्या घराचे फोटो शेअर केले आहे. मलायकाने तिच्या पूलमध्ये वेळ घालवत एक व्हिडिओ शेअर केला आहे. मलायकाने लिहिले की, “मी आजारा बीच हाऊसच्या प्रेमात पडले आहे”. दरम्यान, या सुट्टीत अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा, अमृता अरोरा आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र सुट्टीचे एन्जोय करत आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे योग प्रशिक्षक आणि इतर मित्र देखील आहेत. नुकतीच मलायकाने बहिण अमृतासोबत एक अतिशय सुदर फोटोही शेअर केला. यात दोन्ही बहिणी स्टायलिश स्टाईलमध्ये ड्रिंक्स एन्जॉय करताना दिसल्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा अर्जुनला भेटण्यासाठी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेत पोहोचली. तेथे अर्जुन कपूर त्याच्या आगामी भूत पोलिस चित्रपटाचे शूटिंग करत होता. अर्जुनबरोबर सैफ अली खानदेखील धर्मशाळेत होता. अशा परिस्थितीत करीना कपूर खान, तैमूर आणि मलायका यांनी सैफ आणि अर्जुनबरोबर वेळ घालवला. अलीकडेच मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ती प्रियकर अर्जुन कपूरबरोबर विलगीकरणात होती. विलगीकर्णाच्या काळात त्यांनी किती चांगला वेळ घालवला, याविषयी देखील सांगितले.