प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे कोरोनामुळे ३५व्या वर्षी निधन
मनोरंजन

प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचे कोरोनामुळे ३५व्या वर्षी निधन

चेन्नई : मल्याळम अभिनेत्री सरन्या शशिचे निधन झाले आहे. सरन्याने वयाच्या ३५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सरन्याचे कोरोनामुळे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. तिच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला असून मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मे महिन्यात सरन्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही आठवड्यांनंतर तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. पण तिला इतर काही त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तसेच सरन्याने कर्करोगाशी देखील झुंज दिली होती. सरन्यावर आर्थिक संकट कोसळले होते. तिच्या जवळच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी तिला आर्थिक मदत केली होती. काही आठवड्यांपूर्वी उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावली होती. अखेर सोमवारी सरन्याने अखेरचा श्वास घेतला.

सरन्याने छोट्या पडद्यावर काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तिने सुपरस्टार मोहनलाल आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमधील इतर काही कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे.