मनोरंजन

धक्कादायक; आणखी एका टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी 2020 हे वर्ष हादरवून टाकणारं आहे. आणखी एक टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसू ममता’ या तेलुगू मालिकेतील अभिनेत्री श्रावणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रेमप्रकरणातून श्रावणी हिने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी देवराजा रेड्डी नावाच्या व्यक्तीवर काही आरोप केले आहेत. तो काही दिवसांपासून तिला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी श्रावणीच्या भावाने केली आहे. याप्रकरणी एस्सार नगर पोलीस ठाण्यात त्या व्यक्तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात टीव्ही9 तेलुगूने वृत्त दिले आहे.

श्रावणी गेल्या 8 वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत आहे. श्रावणीने मनसू ममता आणि मौनारागम अशा काही प्रसिध्द मालिकांमध्ये काम केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत