आपल्या नृत्याच्या जोरावर रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईक अडकली विवाहबांधनात
मनोरंजन

आपल्या नृत्याच्या जोरावर रसिकांना घायाळ करणारी मानसी नाईक अडकली विवाहबांधनात

‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर थिरकत तमाम रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक अखेर आज विवाह बंधनात अडकली. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासह तिनं लाग्न्ची गाठ बांधली. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत काही मोजक्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत मानसीचा विवाहसोहळा पार पडला. अभिनत्री दिपाली सय्यद, रेशम टिपणीस यांच्यासह काही कलाकारांनीही मानसीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

मानसी नाईकच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता.सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन ‘एंगेज्ड. भावी मिसेस खरेरा’ असे कॅप्शन मानसीने दिले होते.

त्यानंतर आज अखेर मनसी प्रदीप खरेरासह लग्नबंधनात अडकली. मानसीच्या लग्नाचे हेच फोटो सोशल मीडियावरुन समोर आले आहेत. मानसीच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी तिच्या लग्नात धम्माल केल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्ये नववधूच्या पोशाखात मानसीचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा आहे. सोशल मिडीयावरदेखील नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.

मानसी आणि प्रदीपचे हे लव्ह मॅरेज आहे. गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते अखेर कुटुंबियांच्या समंतीने दोघेही आज लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्येही दोघांची चांगलीच केमिस्ट्री असल्याचे फोटो पाहून दिसते.