तेजश्री प्रधानसोबत झालेल्या घटस्फोटानंतर शशांक होणार बाबा
मनोरंजन

तेजश्री प्रधानसोबत झालेल्या घटस्फोटानंतर शशांक होणार बाबा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने ख्रिसमसचं निमित्त साधत चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून तो लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शशांकने ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा, अशी पोस्ट करत शशांकने गोड बातमी दिली.

शशांकने त्याच्या पत्नीसोबत प्रियांकासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियांकाचं बेबीबंप दिसून येत आहे. शशांक केतकर ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील श्री च्या व्यक्तीरेखेमुळे महाराष्ट्राला परिचित आहे. या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही पडद्यावरची ही जोडी रिअल लाइफमध्ये विवाहबंधनात अडकली. पण हा विवाह फार काळ टिकला नाही. वर्ष-दोन वर्षातच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी शशांकच्या आयुष्यात प्रियांका ढवळे आली. आता शशांक आणि प्रियांकाला मूल होणार असल्याने ते आनंदात आहेत.