अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिली प्रेमाची कबुली
मनोरंजन

अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिली प्रेमाची कबुली

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या एका स्पेशल कवितेमुळे पुन्हा एकचा चर्चेत आली आहे. तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिने ही कविता केली असल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आता तिने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. इतकंच नाही तर तिने तिच्या बॉयफ्रेंडसाठी कविता लिहून प्रपोज केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्राजक्ताने नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी जेव्हा अकरावीत होती, त्यावेळी ती एका मुलाच्या प्रेमात पडली होती. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने एक कविता लिहिली होती. प्रेमाचां रंग ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या पेनाने तिने ही कविता लिहीली होती. प्यार, इश्क, मोहब्बत…ये लब्जभी…सरल शब्द जैसे, सरल नहीं…तो क्या इसके रास्ते और मंजिले क्या खाक सरल होंगे… अशा ओळींची तिने ही प्रेम कविता लिहिली होती.

या मुलाखतीत तिने आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली दिली असली तरी ती ज्याच्या प्रेमात पडली होती, त्या बॉयफ्रेंडचं नाव मात्र तिने सांगितलेलं नाही. सध्या प्राजक्ता सिंगल असल्याचं सांगितलं जातंय. काही दिवसांपूर्वीच तिनं तिच्या लग्नासंदर्भातही एक खुलासा केला होता. तशी लग्नाची तयारी सुरू आहे; पण नवरदेव भेटणं अद्याप बाकी आहे, असं तिने म्हटलं होतं. तिच्या लग्नासाठी आईने सोने खरेदी आणि इतर तयारी केव्हाच सुरू केली आहे. नवरा मुलगा मिळाला, की लग्न करेनच, असं देखील तिने म्हटलं होतं.