लॉकडाऊननंतर मास्टरचे तुफान यश; तीन दिवसांत तब्बल एवढ्या कोटींची कमाई
मनोरंजन

लॉकडाऊननंतर मास्टरचे तुफान यश; तीन दिवसांत तब्बल एवढ्या कोटींची कमाई

चेन्नई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर आता हळूहळू चित्रपटगृहे चालू होण्यास सुरुवात झाली आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित मास्टर या दाक्षिणात्य चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोरोना काळातही एवढी कमाई करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर राज्यातील चित्रपटगृह पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यासाठी काही चित्रपटांचे पुन:प्रदर्शन करण्यात आले. तर सूरज पे मंगल भारी, इंदू की जवानी हे हिंदी तर टेनेट, वंडर वुमन १९८४ हे हॉलीवूडपट असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी टेनेट आणि वंडर वुमन या दोन्ही चित्रपटांनी अंदाजे २० कोटी रुपयांची कमाई केली. सध्या चित्रपटगृह सुरू झाले असले तरीही प्रेक्षक बिग बजेट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. हिंदीतील मोठे चित्रपट प्रदर्शित झाले नसले तरी दाक्षिणात्य अभिनेता विजयची प्रमुख भूमिका असलेला मास्टर हा चित्रपट १३ जानेवारीला तर हिंदी भाषेतील डब चित्रपट १४ जानेवारीला देशभर प्रदर्शित झाला.
https://www.youtube.com/watch?v=pG6Mqb2qzis

या चित्रपटाने पहिल्या दिवशी २५ कोटी तर दुसऱ्या दिवशी ५४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती सिने वितरक अंकित चंदीरामानी यांनी दिली. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बुक माय शो या संकेतस्थळावरही मास्टर या चित्रपटाच्या एक कोटी तिकिटांची विक्री झाल्याचे बुक माय शोचे प्रमुख आशीष सक्सेना यांनी सांगितले. करोनामुळे असलेल्या निर्बंधानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शनापूर्वीच मास्टरला ८० टक्के अधिक प्रेक्षकांनी पूर्वनोंदणी केली.