धक्कादायक! दाक्षिणात्य अभिनेत्रीचे २४व्या वर्षी निधन
मनोरंजन

धक्कादायक! दाक्षिणात्य अभिनेत्रीचे २४व्या वर्षी निधन

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री अ‍ॅलेक्झेंडर डिजवीचे निधन झाले आहे. तिने गोव्यात राहात असलेल्या घरात अखेरचा श्वास घेतला. ती अवघ्या २४ वर्षांची होती. तिच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सुपरस्टार राघव लॉरेन्सच्या कंचना ३ या सुपरहिट चित्रपटात तिने काम केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२० ऑगस्ट रोजी शुक्रवारी अ‍ॅलेक्झेंडरचे निधन झाले. पण तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. तसेच अ‍ॅलेक्झेंडरने आत्महत्या केली असल्याचे देखील म्हटले जात आहे.

India Glitz ने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅलेक्झेंडरचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती, अशी माहिती अ‍ॅलेक्झेंडरच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे नैराश्यामध्ये अ‍ॅलेक्झेंडरने आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.