मनोरंजन

अनुराग कश्यपला समर्थन देणाऱ्या तापसी पन्नुला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने केलेल्या आरोपांनी चांगलीच खळबळ माजली आहे. पायल घोषने केलेल्या आरोपांनंतर आता अभिनेत्री तापसी पन्नू अनुराग कश्यपच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. मात्र अनेक नेटकऱ्यानी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणीही मागितली आहे. अनुराग कश्यपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर आता तापसी पन्नूनेही अनुरागला पाठींबा दिला आहे. इन्स्टावर एक पोस्ट लिहित तापसीने अनुरागची पाठराखण केली. ”माझ्या मित्रा, मला माहित असलेल्यांपैकी तू सर्वांत मोठा स्त्रीवादी आहेस. सेटवर लवकरच भेटू. तू निर्माण करत असलेल्या विश्वात स्त्रिया किती सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे त्यातून स्पष्ट होणार आहे,’, अशी पोस्ट तपासीने केली.

तथापि, अनुराग आणि तापसी हे दोघे चांगले मित्र आहे. अनुरागसोबत तापसीने ‘मनमर्जिया’ आणि ‘ सांड की आंख’ या सिनेमात तापसी मुख्य भूमिकेत झळकली होती. या दोन्ही सिनेमांच्या चित्रिकरणादरम्यान दोघांची मैत्री वाढली. यापूर्वीही अनेकदा तापसीने अनुरागचा सपोर्ट केला आहे.
पण पायल घोषने केलेल्या आरोपांनंतर ती चांगलीच ट्रोल झाली आहे. तापसीच्या या पोस्टने कदाचित अनुराग दिलासा मिलालाल असला तरी नेटकरी मात्र चांगलेच संतापले आहेत. या पोस्टनंतर लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या व्यक्तिच्या बाजूने उभे राहणा-या तापसीला नेटकऱ्यांनी अक्षरश: फैलावर घेतले.

”याद राख, भविष्यात तुझ्यासोबत अशी कुठली घटना घडली तर तू बोलू शकणार नाहीस. लोक हसतील तुझ्यावर, असे एका युजरने तिला सुनावले. तुझ्यासारखी सुमार अभिनेत्री अनुराग कश्यप आणि अनुभव सिन्हासोबतच का काम करते, यात काहीही आश्चर्य नाही. त्याचबरोबर ‘नव्या पिढीसाठी रोल मॉडेल म्हणून तुझ्यासारखी अभिनेत्री आम्हाला नको,” असे एका युजरने तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लिहिले.

पायल’ घोष नक्की काय म्हणाली होती?
‘अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा. या सर्जनशील व्यक्तिमागील राक्षण देशाला पाहू दे. यामुळे माझे नुकसान होऊ शकते, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे़ कृपया मदत करा,’असे ट्विट पायलने केले होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पायलच्या या ट्विटची दखल घेतली आहे. पायलने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असे रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

तर अनुराग कश्यपनेही पायलचे सर्व आरोप फेटाळून लावत म्हंटले आहे की, ”मला शांत करण्याच्या प्रयत्नात इतके खोटे बोललात की तुम्ही एक स्त्री असून देखील या वादात इतर महिलांना ओढून घेतले. थोडी मर्यादा राखा मॅडम. यावर मी फक्त एवढचं म्हणेल की, तुमचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. तसेच कोणत्याच महिलेसोबत मी गैरवर्तन केले नाही आणि त्याचे समर्थन देखील करत नाही. तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर खर काय आहे ते कळते. तुम्हाल खूप प्रेम आणि आशिर्वाद. बाकी तुमच्या इंग्रजीचे उत्तर हिंदीमध्ये दिले याबद्दल माफी. ही तर सुरूवात आहे.अजून बरेच हल्ले होणार आहे. भरपूर फोन आले की, काही बोलू नको,मला शांत राहण्याचा सल्ला दिला. माहीत नाही कधी कोण कशापद्धतीने माझ्यावर टीका करेल” असंही अनुरागनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत