यंदाचा ‘मिस इंडिया 2020 खिताबाची मानकरी मनसा वाराणसी नक्की कोण आहे?
मनोरंजन

यंदाचा ‘मिस इंडिया 2020 खिताबाची मानकरी मनसा वाराणसी नक्की कोण आहे?

मुंबई : तेलंगणाच्या मनसा वाराणसीने यंदाचा ‘मिस इंडिया 2020’ चा खिताब जिंकला आहे. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेमध्ये 23 वर्षाच्या मनसानं आधी 15 आणि नंतर 5 स्पर्धकांवर मात करत हा खिताब आपल्या नावे केला. तिनं याआधी मिस तेलंगणा हा खिताबही जिंकला होता. आता ‘मिस इंडिया’ चा मान पटकावणारी ती तेलंगणामधील पहिली मुलगी ठरली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोण आहे मनसा वाराणसी?
मानसा वाराणसी हैदराबादची रहिवासी आहे. या अगोदर तिने मिस तेलंगानाचा खिताबही जिंकला आहे. मानसा फायनान्शियल एक्सचेंज माहिती विश्लेषक आहे.ग्लोबल इंडियनमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. तिला पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे, योग करणे आणि नृत्याची आवड आहे. मनसाने हैदराबादमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. वसावी अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मसना एका वित्तीय कंपनीतही काम केले आहे.

https://www.instagram.com/p/CKscMZQJzZY/?utm_source=ig_web_copy_link

फेमिना मिस इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हीएलसीसी टॉप 3 विजेत्यांचे नाव जाहीर करण्यात आले. यावर्षी मानसा वाराणसी, मान्या सिंह आणि मनिका शोकंद यांनी अव्वल 3 मध्ये स्थान मिळवले. फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप हरियाणाची मनिका शोओकंद आणि उत्तर प्रदेशची मान्या सिंह या ठरल्या. मनिका 25 वर्षाची तर मान्या 19 वर्षांची आहे.

या कार्यक्रमाला काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील हजेरी लावली. अभिनेत्री वाणी कपूरनं यावेळी नृत्य सादर केलं तर अभिनेत्री चित्रांगदा सिंहनं जज म्हणून उपस्थिती दर्शवली. याआधी मिस इंडिया ठरलेल्या अभिनेत्री नेहा धूपिया म्हणाली की, दिवसेंदिवस या स्पर्धेची रंगत वाढत आहे. यातील स्पर्धकांना मेन्टॉर करणं मला आवडतं आणि प्रत्येक स्पर्धकांचा आत्मविश्वास मला आवडतो, असं नेहा म्हणाली. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता अपारशक्ति खुरानानं केलं. ”कोविड-19 महामारीच्या काळात आयोजित केलेल्या या स्पर्धेचा भाग बनता आलं त्यामुळं मी खूश आहे. अशा भावना व्यक्त केल्या.