मनोरंजन

जनतेच्या पैशातून कंगणाला वाय प्लस सुरक्षा कशासाठी ? उर्मिला मातोंडकरचा सवाल

अभिनेत्री कंगणा रणौतला देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने देखील आक्षेप घेतला आहे. जनतेच्या पैशातून कंगणाला वाय प्लस सुरक्षा कशासाठी द्यायची असा सवाल उर्मिला मातोंडकरने उपस्थित केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गृहमंत्रालयाने कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. यावर उर्मिलाने नाराजी व्यक्त केली. यावेळी उर्मिला म्हणाली,  जनतेच्या पैशातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली. काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय चुकीचं आहे. मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं…तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस जो ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही करुन टॅक्स भरतो. त्या करदात्यांच्या पैशातून कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली…ती काय म्हणून देण्यात आली होती? असा सवाल उर्मिलाने उपस्थित केला आहे.

पुढे उर्मिला म्हणाली, कंगनाने तिच्याकडे माफियांची नावं असल्याचं सांगितलं होतं व त्यासाठी ती मुंबईत येऊन अमली पदार्थ विभागाला ते देणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र ही नावं देण्यासाठी मुंबईत येण्याची गरज नव्हती. फोनवरुनही तिला ही नावं सांगता आली असती.बरं मग आली नाव दिल्यावर त्याच पुढे काय झालं…त्यानंतर तर कंगनाबद्दल बोलणं मला गरजेचं वाटत नसल्याचंही ती यावेळी म्हणाली. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाने कंगनाला चांगलंच खडसावले आहे.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत