मनोरंजन

मुंबई, गोव्यानंतर या राज्यातही शूटिंगला बंदी

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, गोवापाठोपाठ आता ओडिशामध्येही शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. ओडिशामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रूग्ण संख्या पाहता तिथल्या राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपट आणि मालिकेचे इनडोअर आणि आउटडोअर या दोन्ही प्रकारच्या शूटिंगासठी बंदी घातलण्यात आली आहे. त्यामूळे आता मुंबई, गोवा नंतर ओडिशामध्येही चित्रपट आणि मालिका अडचणीत सापडल्या आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला होता. म्हणूनच राज्यातील सर्व मालिकांच्या शुटिंगवर सुद्धा बंदी आणली होती. त्यामुळे सर्व कलाकार शुटिंगसाठी परराज्यात जात होते आणि मुख्यत्वे शुटिंगसाठी गोव्याचा पर्याय अवलंबण्यात आला होता. पण त्यानंतर गोव्यातही मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगासाठी बंदी घालण्यात आली.

त्यानंतर इतर राज्यांचा विचार मेकर्ससमोर असताना आता मात्र ओडिशामध्येही शूटिंगसाठी बंदी जाहीर करण्यात आली. त्यामूळे ज्या शूटिंग चालू ठेवण्यासाठी पर्याय काय, असा प्रश्न चित्रपट आणि मालिकेच्या मेकर्ससमोर उभा राहिला आहे. मुंबईत गेल्या एक महिन्यापासून शूटिंग बंद आहे. त्यामूळे अनेक टीव्ही चॅनल्सनी त्यांचे टीआरपीचे लोकप्रिय शोसाठीच्या शूटिंग राज्याबाहेर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. फ्रेश कंटेट असलेल्या शोचेच टीआरपी मिळत असतात. त्यामूळे अनेक शोच्या मेकर्सनी जुनेच शो सुरू ठेवल्यामुळे टीआरपीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. यात अॅड रेवेन्यूमध्ये बड्या चॅनल्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *